Breaking News

गावकर्‍यांनी नदीपात्रात जात पोकलँड मशीन, टिप्पर पकडले


गोंदियातील मुरदाडा वाळू घाट लिलाव झाला असून या ठिकाणी मागील तीन महिन्यापासून वाळूचा उपसा हा पोकलँड मशीनच्या साहाय्याने रात्र- दिवस सुरु आहे. याची वारंवार तक्रार हि जिल्हा प्रशासनाला देण्यात आली असली तरी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनीं या विषयी कोणतीच गंभीर भूमिका घेतली नाही. याचा त्रास हा रात्री चालत असलेल्या ट्रकमुळे गावक-यांना होत होता. शेवटी गावकर्‍यांनी एकजूट होत आज नदी पात्रात जाऊन पोकलँड मशीन व एक ट्रक याला पकडले. बाकी ट्रकने पळ काढला असून याची माहिती हि पोलीस व महसूल प्रशासनाला देण्यात आल्यावर पोलीस व महसुलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र महसूल प्रशासनाने कुठलीही ठोस पाऊले न उचलता थातुर मातुर पंचनामा तयार केला. मशीन वर क ोणतीच कारवाही करण्यात आली नाही यावरून असे लक्षात येते कि वाळू घाटात जिल्हा प्रशासनाचे हात काळे असल्याचे ग्रामसतांनी सांगितले आहे. या विषयी गोंदियाचे तहसीलदार रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क केले असता त्यांनी सांगितले की आम्ही नियमानुसार कारवाही करू मात्र त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे.