Breaking News

अवैधरित्या दारुची वाहतूक करणार्‍या दोघांना अटक

भंडारा  - भंडारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैधरित्या दारूची तस्करी करणार्‍या दोन महिंद्रा वाहनांसह दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 18 लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


भंडारा राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती मिळाली होती की, पवनी तालुक्यातून दोन अज्ञात आरोपी दोन महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीत देशी विदेशी दारूच्या 100 पेट्या दारू बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्यात घेऊन जाणार आहेत त्याच आधारावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पवनी तालुक्यातील वाही गावाजवळ सापळा रचत दोन काळ्या पांढ-या स्कॉपिओ गाडीना थाब विण्याचा प्रयत्न केला असता गाडी चालकाने गाडी न थांबविल्याने त्यांचा पाठलाग करत अडविले असता या दोन गाड्यातून 100 देशी विदेशी दारूच्या पेट्या आढळून आल्या. गाडी चालक प्रदीप टापरे ,आकाश नंदेशवर याना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध दारू बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.