Breaking News

सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट्य साधणारा सर्वसमावेशक अर्थसंकपल्प - रामदास आठवले

महाराष्ट्राचा यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकर्‍यांना नवसंजीवनी देणारा तसेच सर्व दुर्बल वंचित समाज घटकांना नवे बळ देणारा दिव्यांगांसाह सर्व समाजघटकांना आर्थिक न्याय देणारा सर्व समावेशक अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पातून राज्यात सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट्य साध्य करणारा अर्थसंकल्प राज्याला दिला आहे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले.

जी एस टी लागू झाल्यानंतर आलेला हा पहिला अर्थसंकल्प यात नव्याने 5 लाख 32 हजार करदाते नोंद झाले आहेत. मुंबई महापालिकेला 5826 कोटी आणि अन्य महापालिकांना 5978 कोटी नुकसान भरपाई देण्यात आली आहे. विजटंचाई भरून काढण्यासाठी नवीन 2120 मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती प्रकल्पासाठी 404 कोटी 17 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे 40 लाख शेतकर्‍यांना दिवसा 12 तास वीजपुरवठा करणार. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प. पोलीस दलाच्या अधुनिकीकरणासाठी 13 हजार 365 कोटी 3 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संत गोरोबाकाका महाराष्ट्र्र मातीकला बोर्ड स्थापन करून 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी निधीची भरीव तरतूद करण्यात आली आहे. आगामी 5 वर्षात 10 लाख बेरोजगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार. आगामी काळात 5 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध क रण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधीची तरतूद ; महाराष्ट्र्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन ; राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी वार्षिक उत्पन्न 6 लाखावरून वाढवून 8 लाख करण्याचा प्रस्ताव व या योजनेसाठी 605 कोटी निधीची तरतूद करण्यात अली आहे. सिंधुदुर्गात मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय ; डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवटीकेच्या बळकटीकरणासाठी 40 कोटी रुपयांची तरतूद; विशेष सहाय्य योजनेसाठी 1 हजार 687 कोटींची तरतूद; डॉ बाबासाहेब आंबेडकर सामा जिक विकास योजना ही नवीन योजना अनुसूचित जातींच्या वस्तीच्या विकासासाठी राबविणार; पी इ सोसायटी च्या औरंगाबाद मधील येथील वसतिगृह दुरुस्तीसाठी 2 कोटींची तरतूद ; दिव्यांगांसाठी मोबाईल स्टॉल साठी 25 कोटींची तरतूद आदी अनेक सामाजिक न्याय साधणार्‍या बाबी अर्थसंकल्पामध्ये ठळक आढळतात. या अर्थसंकल्पाचे आपण स्वागत करीत असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे.