Breaking News

पोलीस निरिक्षकांचे तोडगा काढण्याचे प्रयत्न


पोलीस निरीक्षक वसंत भोये आंदोलन सुरु होताच फौजफाट्यासह आंदोलनस्थळी दाखल झाले. कुकडीच्या अधिकार्‍यांवर रोष व्यक्त करीत आंदोलक एकेरीवर येत होते. प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी येवून चर्चा करुन तोडगा काढावा अशी मागणी आंदोलक करीत होते.पोलीस निरिक्षक वसंत भोये हे उपअभियंता पाटील यांच्याशी चर्चा करुन कार्यकारी अभियंता कोळी यांना संपर्क करण्यासाठी प्रयत्नशिल होते. मात्र तोडगा निघत नसल्याने त्यांनी पोलीस नाईक एम. जी. काळे, पो. काँ. मनोज लातुरकर, अमोल मरकड, उमेश गायकवाड आदींना एकत्र करित माईक हातात घेतला आणि सर्व आंदोलकांना ताब्यात घेत असल्याचे जाहीर केले. आंदोलकांना व्हॅनमध्ये बसवून कर्जत पोलीस स्टेशनला आणण्यात आले.