Breaking News

माझ्या वडिलांच्या खुन्यांना मी माफ केले : राहुल गांधी


नवी दिल्ली : मी आणि माझ्या बहिणीनं वडिलांच्या खुन्यांना पूर्णपणे माफ केले असे भावनिक विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सिंगापूरमध्ये केले.1991 साली श्रीपेरूंबदुर येथे 21 मे रोजी राजीव गांधींची हत्या करण्यात आली होती. मला माहीत होते माझे वडील जाणार आहेत, माझ्या आजीची हत्या होणार आहे. राजकारणात तुम्ही परखड भूमिका घेतली तर तुम्हाला मृत्यूसाठी तयार रहावे लागते, असे ते म्हणाले. तसेच प्रभाकरनच्या मृत्यूनंतरही त्यांना आनंद झाला नाही हे त्यांनी कबूल केले.