Breaking News

कापसावरही शंभर टक्के आयात शुल्क लावावे


नागपूर : साखरेप्रमाणे कापसावरही 100 टक्के आयात शुल्क लावण्यात यावे, या मागणीकरीता विविध संघटनांतर्फे शहरातील संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. शेतकरी नेते विजय जावंधिया व श्रीनिवास खांदेवाले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात साखर स्वस्त झाल्याने साखरेची आयात वाढली आहे. राज्यातील साखर कारखानदारांचे नुकसान होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने साखरेवरील आयात शुल्क 100 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस स्वस्त असूनही त्यावर एक टक्काही आयात कर लावण्यात आलेला नाही. हा भेदभाव कापूस पिकविणार्‍या शेतर्‍यांसाठी मारक असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी केला आहे.