Breaking News

शहरटाकळी, रांजणी येथे शिवजयंती उत्साहात साजरी


शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील जयभवानी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्‍वर कारखान्याचे संचालक शिवाजीराव गवळी सेवा सोसायटी अध्यक्ष अ‍ॅड अनिल मडके, प्रजा सुराज्य पक्ष जिल्हाध्यक्ष आत्माराम कुंडकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष गुरूनाथ माळवदे, युवा नेते संभाजी गवळी, जयभवानी मंडळाचे अध्यक्ष संतोष हत्ते, उपाध्यक्ष बाळासाहेब वाघ, ग्रा. पं. सदस्य राजेंद्र खंडागळे, माजी सरपंच अण्णासाहेब शिंदे, मुकेश गीरम, देविदास चव्हाण, आबासाहेब राऊत, शिवाजी खराडे आदी मान्यवरांसह तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. रांजणी येथे शिवजयंती निमित्त ह. भ. प. अक्षय महाराज उगले यांचे शिवचरित्रावर व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिजामाता यांनी शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार महाराजांनी रयतेसाठी केलेला संघर्ष त्यांची दूरदृष्टी यावर उगले महाराजांनी प्रकाश टाकला. महाराजांचा आदर्श युवा पिढीने डोळ्यासमोर ठेवून जिवन जगावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सांस्कृतिक कार्यक्रमात निकीता कर्डिले व देवा शिदोरे या लहानग्यांनी शिवचरित्रावर भाषणे केली. यावेळी माजी सरपंच नवनाथ कर्डिले, पद्माकर थोरात, ग्रा. पं. सदस्य आसाराम नरहे, अरूण थोरात, विकास थोरात, संदिप कुर्‍हाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष नाबदे, राम घुले, संदीप थोरात, संदीप कर्डिले, किरण थोरात, अनिकेत थोटे, दिपक घुले आदींनी परिश्रम घेतले.