Breaking News

‘अंभोरे’त उभे राहतेय विठ्ठल - रुक्मिणी मंदीर! रणजितसिंह देशमुख यांचा पुढाकार


संगमनेर, तालुक्यातील अंभोरे गावामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे विठ्ठल-रुक्मिणीचे भव्य मंदीरबांधण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने या मंदीराची उभारणी करण्यात येणार आहे.

अंभोरे गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी ह. भ. प माउली महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यानिमित्त गावात प्रतिपंढरी निर्माण झाली होती. याप्रसंगी रणजितसिंह देशमुख व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाविकांपुढे बोलतांना देशमुख म्हणाले, अंभोरे गावात अनेकवेळा मंदीर बांधण्याबाबत चर्चा झाली. परंतु योग जुळत नव्हता. सप्ताहाच्या निमित्ताने मंदीर बांधण्याचा निर्णय सर्वांनी एकत्रितपणे घेतला. त्यामुळे या कामाचा लवकरच शुभारंभ करण्यात येईल. उपस्थित ग्रामस्थांनी देशमुख यांच्या समवेत मंदीर निर्मितीसाठी पुढाकार घेत यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार केला. 

याप्रसंगी अंभोरे गावचे सरपंच भास्करराव खेमनर, रावसाहेब खेमनर, सहादू खेमनर, बबनराव खेमनर, भाऊसाहेब बबन खेमनर, लहानू खेमनर, विठोबा खेमनर, किसन खेमनर, दत्तात्रय खेमनर, वाल्मिक खेमनर, बाबूराव खेमनर, संपत खेमनर, रमेश खेमनर , रभाजी खेमनर, हौशिराम वाघमोडे, सुनील खेमनर, ठकाजी खेमनर, हरिभाऊ खेमनर, सचिन खेमनर, तुळशीराम मलगुंडे, नानासाहेब शेरमाळे, सदाशिव खेमनर, नवनाथ कोटकर शरद खेमनर, रामनाथ भारती, अण्णासाहेब जगनर, नानासाहेब खेमनर, रावजी खेमनर आदींसह भाविक भक्त उपस्थित होते. या सप्ताहाची सांगता महाप्रसादाने झाली.