Breaking News

प्रताप भोगाडे ठरला ‘अहमदनगर श्री’चा मानकरी


माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘अहमदनगर श्री’ या शरीर सौष्ठव स्पर्धेत येथील प्रताप भोगाडे हा ‘अहमदनगर श्री’ या पुरस्काराचा मानकरी ठरला. या स्पर्धेत त्याने ११ हजारांचे रोख बक्षिस पटकाविले. युवानेते सुमित कोल्हे यांच्या हस्ते या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. 
येथील संजीवनी प्रतिष्ठान व साई फिटनेसने कोपरगावमधील आंबेडकर पुतळ्यानजिकच्या स्टेजवर या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये जिल्ह्यातून ११० स्पर्धकांनी भाग घेत शरिरसंपदेचे अनोखे प्रदर्शन केले. यावेळी कोपरगांव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विजय वाजे, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष वैभव आढाव, पराग संधान, नगरसेवक रविंद्र पाठक, विवेक सोणवने, अहमदनगर बाॅडी बिल्डींग अॅण्ड फिटनेस असोसिएशनचे सहसचिव संजय सुरवसे, अहमदनगर येथील राष्ट्रीय पंच जयंत गीते, सोहेल शेख , दत्ता रणसिंग, नितीन पारखे, अर्बज शेख, शाह मनसुर शेख, महेश गोसावी आदी उपस्थित होते.

अहमदनगर येथील भरत पवार यांनी बेस्ट पोझरचे ७ हजार रुपयांचे रोख बक्षिस जिंकले. श्रीरामपूर येथील तुषार पार्डे यांनी मोस्ट इम्प्रूवड् बाॅडी बिल्डरचे ५ हजार रुपयांचे बक्षिस जिंकले. तालुकास्तरावर रविंद्र सूर्यवंशी यांनी कोपरगांव श्री हा किताब व ५ हजार रुपयांचे बक्षिस मिळविले तर मोस्ट इम्प्रूवड् बाॅडी बिल्डरचे ५ हजारांचे बक्षिस बिलाल तांबोळी यांनी जिंकले. उदयोन्मुक बाॅडी बिल्डर म्हणून निखिल पोटे यांचा सत्कार कोल्हे यांचे हस्ते करण्यात आला. सर्व विजेत्यांना कोल्हे यांचे हस्ते बक्षिसे देण्यात आली. स्पर्धा पहाण्यासाठी कोपरगांवकरांनी मोठी गर्दी केली होती.