Breaking News

बीड जिल्हयात महिला दिनाच्या पुर्वसंध्येला विवाहीतेस पेटविले

बीड, (प्रतिनिधी):- आपली संस्कृती हि मातृसत्ताक आहे. जिथे महिलांना मान मिळतो तिथेच लक्ष्मी नांदते. आपन संपुर्ण महाराष्ट्रवासी स्त्री शक्तीचे स्वरूप असलेल्या आई तुळजाभवानी ची कुलदैवत म्हणून पुजा करतो परंतु आपल्या समाजातील बुरसटलेली मानसीकता स्त्रीयांप्रती आजही वैदीक विचार जपुन आहे. याचाच प्रत्यय बीड जिल्हयातील माजलगांव तालुक्यातील चिंचगव्हान येथे आला. अंगावर शहारे येणारी घटना घडली असुन महिला दिनाच्या पुर्व संध्येला वैचारीक मागासलेपनाची प्रचिती आली आहे.


महिला दिनाच्या पुर्वसंध्येलाच एका 28 वर्षीय विवाहितेस सासरच्या लोकांनी जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची दुर्दैवी घटना चिंचगव्हाण ता.माजलगाव येथे काल सक ाळी घडली. सदर विवाहिता 95 टक्के भाजली असुन बीड जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. जगभरात आज मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा होत आहे. परंतु महिला दिनाच्या पुर्व संध्येला बीड जिल्हयात एका महिलेला जाळल्याची घटना घडली आहे. महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घडत आहे. बीड जिल्हा ही महिला अत्याचार ग्रस्त जिल्हा म्हणुुन महाराष्ट्रात ओळखाला जात आहे. स्त्री भु्रण हत्याने जिल्हा महाराष्ट्रात बदनाम झालेला असतांना महिला अत्याचारातही वाढ झाली आहे. जिल्हयातील माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील एका 28 वर्षीय विवाहीत महिलेला सासरच्या मंडळीने घरात कोंडुन, जाळुन टाकल्याची दु:खद घटना घडली. विवाहीता 95 टक्के भाजली असुन गेवराई येथे उपजिल्हा रुग्णालया येथे प्राथमिक उपचारा करीता पुढील उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. 
चिंचगव्हाण येथील राधिका गजानन गोरकर (वय 28) या विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी काल पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान झोपीत असतांना अंगावर रॉकेल टाकुण पेटवुन देण्यात आले. कु्ररपणाची परिसीमा गाठत सर्व सासरची मंडळी पेटवुन दिल्या नंतर घराची बाहेरची कडी लावुन पसार झाले. राधिकाचा स्व:ताला वाचविण्यासाठी आरडा-ओरडा ऐकुन शेजारी धावत येउन त्यांनी दारवाजा तोडला तो पर्यंत राधिका गोरकरही 95 टक्के भाजली होती. तीला तात्काळ गेवराई येथे उपचारार्थ दाखल केले. परंतु राधिक ा हीची परिस्थीती गंभीर असल्याने तिला तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात दाखल कण्यात आले असुन तीच्या वर उपचार सुरू आहे. दरम्यान महिला दिनाच्या पुर्वसंध्येलाच महिला अत्याचाराची दुर्दैवी घटना घडल्याने बीड जिल्हयात संताप व्यक्त होत आहे.