जुगार अड्ड्यावर तंटामुक्ती अध्यक्षासह 5 जणांना अटक
सातारा, दि. (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील बीबी येथे पत्त्याच्या पानावर जुगार खेळणार्या 5 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली असून, संश यितांकडून 1 लाख 82 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांमध्ये तंटामुक्तीच्या माजी अध्यक्ष बळवंत लक्ष्मण नलवडे (वय 63, रा. बीबी) याचा समावेश आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बीबी गावच्या हद्दीत जुगार खेळत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. पोलिसांनी पथक करून त्यानुसार छापा टाकला असता, संशयित बळवंत लक्ष्मण नलवडे (वय 63, रा. बीबी), आबा बबन तरडे (वय 48, रा. मलवडी), प्रकाश बबन बोबडे (वय 45, रा. बीबी), संजय लक्ष्मण टकले (वय 38, रा. मलवडी), गणेश विठ्ठल नायकवडी (वय 40, रा. आळजापूर सर्व ता. फलटण) हे मोकळ्या रानात बाभळीच्या झाडाखाली जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर परिसरातून दुचाकी, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 82 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, बीबी गावच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकल्यानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी सर्व संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेवून त्यांना लोणंद पो लिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसणे, शशिकांत मुसळे, पोलीस हवालदार नागे, मोहन नाचण, रविंद्र वाघमारे, योगेश पोळ, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, गणेश कचरे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.