Breaking News

माजी आ. मुरकूटे शिर्डी दंगलीतून निर्दोष


श्रीरामपूर ता. प्रतिनिधी - शिडीँ येथे २००४ मध्ये झालेल्या दंगली प्रकरणातून माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्यासह १४९ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यामध्ये सचिन तांबे, धंनजय गाडेकर, बाबुराव पुरोहित आदींचा समावेश आहे. कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश शेख यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. या खटल्यात अँड. सुभाष चौधरी व कोपरगाव येथील अँड जंयत जोशी, अँड. अतुल चौधरी, अँड. एम. यू. सय्यद यांनी काम पाहिले. शिडीँ येथे अतिक्रमण केलेल्या दुकानदारांविरूध्द शासनाने २००४ मध्ये कारवाई केली होती. त्यावेळेस सदर दुकानदारांनी बाबुराव पुरोहीत यांच्या नेतृत्वाखाली शासनास विरोध केला होता. यावेळी दंगल होऊन गोळीबार करण्यात आला होता. या खटल्यात मुख्याधिकारी गायकवाड, तहसिलदार गिरासे, प्रांताधिकारी महाजन यांच्या साक्षी घेण्यात आल्या. त्यात आरोपींविरुद्ध काहीही निष्पन्न झाले नाही. सदरचा बचाव व पोलिसांच्या साक्षीतील विसंगती यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधिश शेख यांनी माजी आ. मुरकुटेंसह १४९ जणांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.