Breaking News

लहवीत दगडफेक प्रकरणी पोलिसांकडून समाजकंटकांना सज्जड इशारा


नाशिक जिल्हातील भगूर या गावापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या लहवीत गावातील अंबड गावठाण भागात गेल्या 15 ते20 दिवसापासून वेळीअवेळी दगड फेक होत आहे .त्यामुळे गावकरी भीतीच्या सावटाखाली आहेत या प्रकाराविषयी पंचक्रोशीत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे . दरम्यान आज देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष डवले यांच्यासह पोलीस पाटील संजय गायकवाड यांनी घटनास्थळीभेट देऊन पाहणी केली तसेच गावकर्यांची बैठक घेतली. दरम्यान पोलीस निरीक्षकांनी गावक र्‍यांच्या बैठकीत बोलतांना संबंधीत प्रकार करणार्‍या समाजकंटकांनी असले गैर प्रकार त्वरित थांबवावेत अन्यथा खाकीचा खाक्या दाखवून कठोर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा दिला.