Breaking News

दिव्यांग अभिजीत जलतरणमध्ये राज्यात चौथा

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील दिव्यांग खेळाडू अभिजीत जगन्नाथ माने याने गोंदिया येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत चौथा क्रमांक पटकाविला. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहा. विभाग तसेच अपंग कल्याण आयुक्तालय (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच दिव्यांगांसाठी राज्यस्तरीय विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत माने याने यश मिळवले आहे.

समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषदच्या वतीने पार पडलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत अभिजीत माने याने सलग तीन वर्ष प्रथम येण्याचा बहुमान पटकावित, विजयाची हॅटट्रीक केली होती. या उत्कृष्ट कामगिरीने त्याची या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होवून, त्याने चौथा येण्याचा बहुमान पटकाविला आहे. अभिजीत माने टिळक रोड येथील मतीमंद मुलांच्या शाळेचा विद्यार्थी असून, तो वाडियापार्क क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात सराव करीत आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रामदास ढमाले, रावसाहेब बाबर, जगन्नाथ माने, शाळेच्या मुख्यध्यापिका स्नेहा महाजन, शिक्षिक भाऊसाहेब कदम आदिंनी अभिनंदन केले असून, सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.