Breaking News

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी 4 जणांना अटक


मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने 4 जणांना अटक केली. सीबीआयने पीबीआयचे लेखापरीक्षक, नीरव मोदीच्या कंपनीतील 2 कर्मचारी आणि गीतांजली ग्रुपच्या संचालकांना अटक केली आहे. फायरस्टार्टर डायमंड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे तत्कालीन वित्तव्यवस्थापक अनिल पांड्या आणि अतिरिक्त महाव्यवस्थापक मनीष के. बोसामीया यांना पीएनबीला देण्यात आलेली पारपत्रे तयार करण्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली. लेखापरीक्षक असलेले संजय रांभिया यांनाही सीबीआयने अटक केली आहे. पीएनबी घोटाळ्याची सुरुवात 2011मध्ये झाली होती. यावर्षी जानेवारीमध्ये पीएनबीने सीबीआयकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला होता.