Breaking News

शिक्षक सोसायटीची आर्थिक शिस्त वाखाणण्याजोगी : डॉ. विखे


शिक्षकी पेशा व शिक्षकांना समाजात मोठा मान असतो. समाज घडविण्याची मोठी ताकद शिक्षकांमध्ये आहे. सध्याच्या काळात आर्थिक संस्थांसमोर कर्ज वाटप केल्यावर वसुलीचा प्रश्न असतो. मात्र, या संस्थेचे सभासद शिक्षक असल्याने संस्थेचे कर्ज सुरक्षित असते. सहकाराचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात माध्यमिक शिक्षक सोसायटीचे कामकाज आदर्शवत आहे. या संस्थेची आर्थिक शिस्त वाखाणण्याजोगी आहे, असे प्रतिपादन युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी केले. 
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे ३२९ सभासद शिक्षक यंदा सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना माध्यमिक शिक्षक सोसायटीतर्फे समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी डॉ. विखे बोलत होते. याप्रसंगी सेवानिवृत्त होणार्‍या सभासदांचा प्रत्येकी ८ हजार ५०० रुपयांचा धनादेश तसेच शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सभापती राहुल झावरे, माजी जि. प. सदस्य सचिन जगताप, नगरसेवक सुभाष लोंढे, संस्थेचे चेअरमन किशोर जाधव, व्हा. चेअरमन सुरेश मिसाळ, ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे, सचिव सोन्याबापू सोनवणे, संचालक अप्पासाहेब शिंदे, उत्तम खुळे, सुनिल काकडे, सुनिल वाळुंज, सूर्यकांत डावखर, विनायक उंडे, कल्पना जिवडे, धनंजय म्हस्के, चांगदेव खेमनर, उत्तम जगताप, कल्याण ठोंबरे, भास्कर कानवडे, अंबादास राजळे, बाबासाहेब बोडखे, काकासाहेब घुले, केशव गुंजाळ, शैला जगताप, पुंडलिक बोठे, सय्यद जाकीर हुसेन, राजेंद्र सोनवणे प्रा. भास्करराव जर्‍हाड आदींसह संस्थेचे सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी चेअरमन किशोर जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जि. प. सदस्य सचिन जगताप, डॉ. राहुल झावरे यांच्यासह सेवानिवृत्त सभासदांची भाषणे झाली. सूत्रसंचालन धनंजय म्हस्के यांनी केले. आभार सुरेश मिसाळ यांनी मानले.