Breaking News

अट्टल दरोडेखोर आष्टी पोलीसांच्या ताब्यात


आष्टी (प्रतिनिधी):- बीड सोलापुर औरंगाबाद अहमदनगर पुणे जिल्हामध्ये धुमाकुळ घालणारा अटल दरोडेखोर आठल्या ईश्‍वर भोसले यास आष्टी पोलीसांनी जिवाची बाजी लावुन अथक परीश्रमानंतर ताब्यात घेतले आहे, गेले अनेक दिवस तो पाच जिल्हातील पोलीसांना गुंगरा देणारा व अनेक साथीदारासह टोळी तयार करुन दरोडे,जबरी चोरी, घरफोडी सारखे घटना प्राणघातक हल्ला करुन लुट करण्याचे सवईचा दरोडेखोर टोळी प्रमुख अटल्या भोसले यास मोठया शिताफिने सापळा रचुन ताब्यात घेण्यात आलेले आहे, यापुर्वी त्यांने त्यास पकडण्यास गेलेल्या पोलीसांवर हल्ला करुन पोलीसांना जखमी करुन पळुन गेलेला होता, मात्र या वेळेला सर्व तयारीनिशी व मोठा शिताफीने सापळा रचुन त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे. जवळपास आष्टी पोलीस हे गेले एक महीनाभर परीश्रमानंतर त्याचे पदरी यश मिळालेले आहे, पोलीस स्टेशन आष्टी येथे हजर असताना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे आष्टी येथील गुन्हया मध्ये तसेच मोक्का गुन्हया मध्ये हवे असलेले आरोपी 1) आटल्या ईश्‍वर भोसले वय 25 वर्ष 2) ईश्‍वर गणा भोसले वय 45 वर्ष हे त्याचे राहते कानडी शिवारातील अज्ञात स्थाळावरून बेलगाव मिरजगाव मार्गे पहाटेच्या वेळी निघणार आहेत. सदर गोपनिय माहिती पहाटे पोलीसांना बातमीदाराने येऊन सांगीतल्याने सदर बातमीचा आशय पोलीस निरीक्षक,श्री सय्यद यांनी मा.पोलीस अधीक्षक,बीड श्री.जी.श्रीधर, मा.अपर पोलीस अधीक्षक, वैभव कलबुर्मे तसेच श्री.डॉ.अभिजीत पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग आष्टी यांना कळवुन त्याचे मार्गदर्शनाखाली बातमीदाराने दिलेल्या बातमीच्या निशाण्यावरुन पुढील बातमीच्या माहिती प्रमाणे वेगवेगळे तिन पथके तयार करून कानडी शिवारातील वेगवेगळया भागा मध्ये दबा धरून बसलो असतांना बातमीदाराने सांगीतले की, सदरचा आरोपी हा त्याचे मोटार सायकलवर भरधाव वेगाने मिरजगावकडे गेला आहे असे सांगीतले. त्या दिशेने त्याचा पाठलाग करतांना पुन्हा बातमीदाराने सांगीतले की, सदरचा आरोपी हा मिरजगाव कडून कर्जत श्रीगोंदा कडे गेल्याचे कळविल्याने त्याचा पाठलाग केला असता, सदर वर्णनाचे आरोपी हे श्रीगोंदा गावाचे पुढे असलेला ढोरमोह साखर कारखाना समोरून रेल्वे गेट क्रॉस करून जात असतांना त्यास हाक मारला असता, तो पुन्हा भरधाव वेगात गाडी चालवुन साखर कारखाण्याच्या दिशेने पळुन जात असतांना गाडी स्लीप होऊन जोरात आदळुन पलटी झाली व तो रोडच्या बाजुला दुरवर जाऊन पडला. त्याचा पाठलाग करणारे पथकातील पोशि/1302 गायकवाड व पोना/1526 दराडे यांनी त्याच्यावर झडप घातली असता, त्याच्या हाता व पायाला जखम झाली तेवढयात तेथे सर्व पथक एकत्र येऊन सदर आरोपीस पकडण्यात आले. सदरचा आरोपी हे कुख्यात दरोडेखोर असून आष्टी भागात तसेच सोलापुर, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे ग्रामीण ईत्यादी जिल्हयात पाहिजे होते. सदरचे आरोपी हे दरोडा, घरफोडी व जबरी चोरी करण्याच्या सवयीचे होते. त्यांनी यापुर्वी त्यांना पकडण्यास गेलेल्या पोलीस पथकावर त्यांनी व त्यांच्या साथीदाराने दगडफेक केली होती. हे दोघे आरोपी पोलीसांनवर चाल करून पळुन जायचे सवयीचे आहेत. या भागामध्ये त्यांची प्रचंड दहशत होती. त्यामुळे त्या भागातील शेतकरी व राहते गावकरी हे त्यांना भयभीत होऊन पोलींसाना माहिती देत नव्हते. आरेापी मजकुर याचे विरोधात खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.पोलीस ठाणे आष्टी गु.र.न. 51/2000 कलम 395 भा.दं.वि., पोलीस ठाणे आष्टी गु.र.नं. 56/05 कलम 457,380 भा.दं.वि., पेलीस ठाणे आष्टी गु.र.नं. 115/17 क लम 304(ब),306,498,34 भा.दं.वि., पोलीस ठाणे आष्टी गु.र.नं. 132/15 कलम 307,332,333,353,399,504,427, पोलीस ठाणे आष्टी गु.र.नं. 74/08 कलम 457,380 भा.दं.वि., पोलीस ठाणे आष्टी गु.र.नं. 185/09 कलम 420,34 भा.दं.वि., पोलीस ठाणे आष्टी गु.र.नं. 151/12 कलम 420,34 भा.द.वि., पोलीस ठाणे आष्टी गु.र.नं. 60/18 कलम 399,332,336 भा.दं.वि., पो.ठा जेजुरी गु.र.नं 329/16 कलम 395,397 भा.दं.वि, पो.ठा जेजुरी गु.रं.न 334/16 कलम 395 भा.दं.वि, पो.ठा पाथर्डी गु.रं.न 49/18 कलम 396 भा.दं.वि, पो.ठा कर्जत गु.रं नं 64/16 कलम 399 भा.दं.वि, पो.ठा अंभोरा गु.र.न 395/17 कलम 395 भा.दं.वि व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम. या बरोबरच त्याचे वर सोलापुर,पुणे ग्रामीण या जिल्हात सुदधा गुन्हे दाखल आहेत.
आटल्या ईश्‍वर भोसले याने त्यांच्या साथीदारांचे मदतीने टोळी निर्माण करून दहशत निर्माण केली होती. परंतू पोलीस स्टेशन आष्टीच्या धाडसी कार्यवाहीने 7 दरोडेखोर पकडल्याने मोठया प्रमाणात घरफोडी व चोरी अशा प्रकराच्या गुन्हया मध्ये घट आली आहे. सदरच्या कार्यवाही मध्ये पोलीस निरीक्षक, सय्यद शौकत अली, सफोै/क ांबळे,पोह/नरवडे, पोना/अनिल सुंबरे,पोह/अनिल आगलावे, पोना/विकास राठोड, पोना/ पांडूरंग दराडे, पोशि/ सोमनाथ गायकवाड,पोशि/राकेश लोहार,पोशि/प्रदीप पिंपळे,पो शि/रियाज पठाण,पोशि/गोविंद काळे,पोशि/सचिन कोळेकर व दक्ष नागरीक कुमार लोंढे, पप्पु साळुंके यांचा सहभाग होता.सदरची कार्यवाही ही मा.श्री.जी.श्रीधर ,पोलीस अधीक्षक,बीड, मा. वैभव कलुबर्मे , अपर पोलीस अधीक्षक, बीड तसेच श्री.डॉ.अभिजीत पाटील,पोलीस उपअधीक्षक,उपविभाग आष्टी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.