Breaking News

तहसीलदार आणि मंडलाधिकाऱ्यांची चौकशी करा : मागणी

श्रीगोंदा तालुक्याच्या महसूलचे मंडलाधिकारी निलेश वाघमारे यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी. तेथे कार्यरत असलेल्या तहसिलदारांचीही अवैध गौणखनिज तसेच वाळू उपशाची चौकशी करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेने केली आहे. यासंदर्भात राहुरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. 

श्रीगोंदा येथील पत्रकार मच्छिंद्र सुद्रीक यांनी अवैध गौण खनिज तसेच वाळू उपशाच्या निवेदनाची बातमी प्रसिध्द केल्याचा राग धरून मंडलधिकारी वाघमारे यांनी पत्रकार सुद्रीक यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारचा राहुरी तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले, विनीत धसाळ, बाळासाहेब नवगिरे, अनिल कोळसे, संतोष जाधव, गोविंद फुणगे, सतिष फुलसौंदर, मनोज साळवे, शरद पाचारणे, रियाज देशमुख, गणेश विघे, विजय भोसले आदींसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.