Breaking News

विद्यार्थी, दुधवाल्यांना मोकाट कुत्र्यांचा त्रास


अहमदनगर / प्रतिनिधी । दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा त्रास शहरासह उपनगरामध्येही वाढत चालला आहे. यामध्ये सकाळी सकाळी विद्यार्थी शाळेसाठी, दुधवाले, मजूर कामासाठी जात असताना रस्त्याच्या बाजूला चौकाचौकामध्ये मोकाट कुत्रे बसलेले असतात. त्यामध्ये शहराबाहेरून येणार्‍या दुधवाल्यांना या मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर शाळा कॉलेजसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या मागे पळणे, चावा घेणे असे प्रकार मोकाट कुत्र्यांमुळे घडून येत आहे. त्याचबरोबर सायकल, गाडीवरून पडण्याचे प्रमाणदेखील वाढलेले आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी देखील ही मोकाट कुत्रे दुचाकींच्या मागे पळणे असे प्रकार देखील घडत आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर जाणे अपेक्षित असते परंतू या मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यांवर अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.