Breaking News

श्रीरामनवमी उत्‍सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

साईबाबा संस्‍थानच्‍यावतीने शनिवार {दि. २४} ते सोमवार {दि. २६} याकाळात श्रीरामनवमी उत्‍सव साजरा करण्‍यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे, अशी माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली. 

रामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी {दि. २५} रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. शिर्डीत श्रीरामनवमी उत्‍सवाची सुरुवात १९११ मध्‍ये श्री साईबाबांचे अनुमतीने करण्‍यात आली. तेंव्‍हापासून दरवर्षी हा उत्‍सव मोठ्या उत्‍साही वातावरणात साजरा केला जातो. शनिवारी {दि. २४} पहाटे श्रींची काकड आरती, ५.०० वाजता श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, ५.१५ वा. व्‍दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ५.२० वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, दुपारी १२.३० वा. माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी ४.०० वा. ते सायं. ६.०० यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर कीर्तन होणार आहे. सायंकाळी ६. ३० वा. धुपारती होणार आहे. रात्रौ ९.१५ वा. चावडीत श्रींच्‍या पालखीची गावातून मिरवणूक काढण्‍यात येईल. मिरवणूक परत आल्‍यानंतर रात्रौ १०.३० वा. शेजारती होईल. यादिवशी पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहणार आहे.

उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, सर्व विश्‍वस्‍त संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, पोलिस उपअधिक्षक आनंद भोईटे, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर आदींसह सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्‍नशील आहेत.