Breaking News

आपलं सरकार योजनेत एक कोटीच्या गैरव्यवहाराचा आरोप

सोलापूर - ग्रामीण भागामध्ये आपल सरकार योजनेमार्फत देण्यात येणार्‍या सोयी-सुविधांमध्ये 1 कोटी 19 लाख रुपयांचा गैरप्रकार झाला असून प्रशिक्षण न देताच परस्पर पैसे उचलण्यात आल्याचा आरोप करीच चौकशीची मागणी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी केली. कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा व्यवस्थापक महावीर काळे यांनी संपूर्ण आरोप फेटाळले. त्या प्रशिक्षणाच्या पैशांमधून दुरुस्ती खर्च, जिल्हा ते राज्यपातळीवरील कर्मचार्‍याचे मानधन देण्यात येत असून गैरप्रकाराचा आरोप चुकीचा असल्याचे, त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या स्थायी स मितीची बैठक उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सदस्य उमेश पाटील यांनी आपलं सरकार सेवा योजनेत गैरप्रकार झाल्याचे आरोप केले. 14 वा वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीकडून त्यासाठी पैसे घेण्यात येतात. प्रत्येक महिन्यास प्रशिक्षणासाठी 1300 रुपये खर्ची पडतात. पण, सन 2016 पासून आतापर्यंत फक्त दोन वेळा प्रशिक्षण झाले. दोन कोटी 19 लाख रुपयांचा गैरप्रकार झाल्याचे, त्यांनी सांगितले. त्याबाबत बोलताना जिल्हा व्यवस्थापक काळे म्हणाले, दरमहा 12 हजार रुपयांपैकी सहा रुपये केंद्रस्तरीय कर्मचार्‍याच्या वेतनासाठी देण्यात येतात. त्या 1300 रुपयांमधून कॉलसेंटर, हार्डवेअर, जिल्हा ते राज्य समन्वयक यांचे पगारीसाठी पैसे दिले जातात. केंद्र व राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे नियंत्रण आहे. शासनाच्या सुचनेद्वारे कंपनीचे कामकाज चालते. जिल्ह्यातील 774 ग्रामपंचायतींमध्ये सुविधा आहे. पण, त्यापैकी 263 ग्रामपंचायतींनी जुलै ते डिसेंबर महिन्याचे पैसेच दिले नाहीत. योजनांमध्ये कोणताही गैरप्रकार घडला नसल्याचे व्यवस्थापक काळे यांनी स्पष्ट केले.