Breaking News

माझ्या पाठीशी देवाचा हात : रजनीकांत

चेन्नई - अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या रजनीकांत यांनी, आपल्या पाठिशी भाजप असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. त्यांनी म्हटले आहे, की भाजप नाही, तर केवळ देव आणि जनताच माझ्या पाठिशी आहे. तसेच कोणताही राजकीय पक्ष आल्या पाठिशी नाही, असेही रजनीकांत यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

रजनीकांत म्हणाले, भाजप माझ्या पाठीशी असल्याचे वृत्त येत आहे. पण, मी सांगतो, की माझ्या पाठीशी केवळ देव आहे आणि जनतेचा पाठिंबा आहे. तुम्ही मला कितीही वेळा यासंदर्भात प्रश्‍व विचारला, माझे उत्तर सारखेच असेल. यावेळी रजनीकांत यांनी पेरियार यांच्या पुतळ्याच्या विटंबनेसंदर्भात निषेध व्यक्त केला. तसेच राम राज्य रथ यात्रेसंदर्भातील वादावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, तामिळनाडू हे एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. त्यामुळे मला विश्‍वास आहे, की पोलीस नक्कीच धार्मिक शांतता राखतील. 
तत्पूर्वी, वर्षाच्या सुरुवातीलाच रजनीकांत यांनी, आपण सक्रिय राजकारणात भाग घेणार असून, येणार्‍या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण 234 जागांवर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते.