Breaking News

राज्याच्या हितासाठीच एनडीएमधून बाहेर पडलो : चंद्राबाबू नायडू

अमरावती : राज्याच्या हितासाठीच तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडली असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. नायडू यांनी मंगळवारी टीडीपीचे खासदार आणि विधानसभेच्या योजना समितीच्या सदस्यांशी टेलिकॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याला विशेष दर्जा मिळण्याबाबत आणि अविश्‍वास ठरावा या मुद्द्यांवर चर्चा केली. राज्याच्या हितासाठीच आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झालो होतो. आम्ही राष्ट्रीय आघाडीत असलो तरी आमच्यासाठी राज्य महत्वाचे आहे. राज्यासाठीच आम्ही राष्ट्रीय राजकारणात सामील होतो, असेही ते म्हणाले. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा यासाठी टीडीपीचे खासदार निदर्शने करत आहेत. नायडू यांनी खासदारांना सतर्क राहण्याचा आणि परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. भाजप, जनसेना आणि वायएसआर काँग्रेसने टीडीपीची प्र तिमा मलिन केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.