Breaking News

‘प्रवरे’च्या विद्यार्थ्यांची डिपेंक्ससाठी निवड


प्रवरानगर / प्रतिनिधी  - प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीयवर्षाती विद्यार्थ्यांची वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथे होणाऱ्या डिपेंक्स आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय प्रदर्शन स्पर्धेत निवड करण्यात आली. यासाठी या विद्यार्थ्यांना प्रा.विशाल केदारी यांचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये अमोल तरकसे, विजय घोगरे, महेश कलांगडे, शुभम खर्डे, संकेत चोपडे, श्रीकांत डांगे यांच्या ‘हाताने दूध काढणी यंत्र’ तर शुभम राख, सूरज जगताप, मृणाली जगताप, प्रतीक्षा अभंग आदींच्या अपारंपरिक खाद्य ऊर्जा स्तोत्र या दोन चमूची निवड करण्यात आली, अशी माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली. 

यायशाबद्दल राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, प्राचार्य ऋषिकेश औताडे आदींसह शिक्षकांनी अभिनंदन केले.