Breaking News

ग्रीन रिफायनरीबाबत करार नाही - उद्योग मंत्री

सिंधुदुर्गनगरी, दि. 12, मार्च - राजापूर नाणार येथे होऊ घातलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प जनतेला नको असेल तर तो लादला जाणार नाही. शिवसेना नेहमीच जनतेसोबत राहील अशी स्पष्ट भू मिका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केली. कणकवली येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाबाबत महाराष्ट्र मँग्नेटिक परिषदेत कोणताही करार करण्यात आलेला नाही. या प्रकल्पासाठी जर शासन अधिसूचना जाहीर करू शकते तर ती अधिसूचना रद्दही करू शकते अस देसाई यांनी स्पष्ट केले. नारायण राणे यांच्यावर देखील देसाई यांनी जोरदार टीका केली.

उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री उपक्रम एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग दौर्‍यावर आले होते. कणकवलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत देसाई यांनी आपल्या दौर्‍याचा उद्देश स्पष्ट केला. कणकवली नगर पंचायतीवर भगवा फडकणारच अस त्यांनी ठामपणे सांगितले.
नाणार येथे प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्योग मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जनतेचा या प्रकल्पाला विरोध असताना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प जनतेवर लादणार नाही असे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. नारायण राणे यांना शिवसेनेने दोनदा धूळ चारली आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी राणे हे आव्हान नसल्याचे देसाई यांनी सांगितले.