Breaking News

गिरणी कामगारांचा 16 मार्चला कुडाळला मेळावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 12, मार्च - कुडाळ येथे शुक्रवार 16 मार्चला गिरणी कामगार तसेच ईपीएस 95 पेन्शनधारकांचा मेळावा सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी 11 वाजता सिद्धिविनायक हॉल, कुडाळ रेल्वेस्टेशन रोड येथे होणार आहे.

या मेळाव्यात मुंबईच्या गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्‍नासंदर्भात सरकार तसेच म्हाडाकडून घेण्यात येणा-या धोरणाची माहिती देण्यात येईल. तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने आतापर्यंत एकही गिरणी कामगारांच्या घराचे बांधकाम केले नाही. तसेच घरे कधी व कुठे देणार, याबाबत कुठलेही ठोस धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे एकप्रकारे गिरणी क ामगारांना वा-यावर सोडल्यासारखी स्थिती झाली आहे. विरोधी पक्षात असतांना सर्व गिरणी कामगारांना मोफत घरे मिळालीच पाहिजेत, या मागणीला पाठिंबा देणारे शिवसेना व भाजप आता सत्तेत गेल्यावर गिरणी कामगारांना विसरले. त्यामुळे गिरणी कामगारांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अशा स्थितीत सर्व गिरणी कामगारांना मोफत घरे देऊन पुनर्वसन झाले पाहिजे, ही मागणी घेऊन पुन्हा एकदा गिरणी कामगारांना जागे करुन तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय सर्व श्रमिक संघटनेने घेतला आहे. नोकरी गमावल्यामुळे बहुसंख्येने गावी परतलेल्या गिरणी कामगारांचे जिल्हावार मेळावे मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून शुक्रवार 16 मार्चचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
म्हाडाकडून गिरणी कामगारांनी आपल्या घरासाठी जे अर्ज भरले आहेत, त्याची सध्या छाननी सुरू आहे. त्याबाबत मेळाव्यात माहिती देण्यात येईल. तसेच विधीमंडळाच्या आगामी अधिवेशन क ाळात मुंबईत तीव्र आंदोलन करण्याचे ठरले असून त्याची तारीखही यावेळी जाहीर करण्यात येईल. या मेळाव्याला सर्व श्रमिक संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उदय भट व बी. के. आंब्रे मार्गदर्शन करणार आहेत.