Breaking News

आ.कांबळेच्या कार्यकाळात एकही रस्ता झाला नाही ; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी


श्रीरामपुर/ ता.प्रतिनिधी/ - श्रीरामपुर तालुक्यातील प्रवरानदी काठचा पट्टा म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटिल यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे या भागातील जनतेने आमदार कांबळे याना सलग दोन वेळा निवडून आणले. परंतु आमदार कांबळेनी मते घेतली, परंतु याभागातील रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली आहे. त्याचे भाग्य काही मात्र उजळले नाही. 

यामध्ये प्रमुख रस्ता आहे. तो फत्याबाद ते चांडेवाडी ५ कि. मी. रस्ता गेली दहा वर्षात कांबळे यांनी या रस्त्यासाठी कुठलाच निधी दिला नाही. श्रीरामपुर तालुक्यात अनेक रस्ते आज ही खराब अवस्थेत आहे. जे रस्ते झालेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. तालूक्यात गेली अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेल्या शेती महामंडळच्या जमीनी, ग्रामपंचायत दिल्या गेल्या नाही. आमदार निधीतुन प्रवरा पट्टात कुठलेही ठोस काम केले नाही. तसेच राहुरी तालुक्यातील जोडलेली गावे याकडे केवळ निवडणूक आल्या वर मतदान मागण्यासाठी जातात. त्यानंतर या भागातील अडचणी व प्रश्न सोडवण्या साठी दुर्लक्ष होत आहे. अनेक रस्ते खराब आहे. पण ते दुरूस्त होऊ शकले नाही. आज ही गोदावरी काट व प्रवरा काटकडे जाणारे रस्ते खराब आहे. पण आमदार कांबळे यांनी कधी रस्ते दुरूस्त करण्यासाठी प्रयत्न केला नाही. त्यामुळेच आमदार कांबळे यांच्या वरती ग्रामीण भागातील जनता मोठ्या प्रमाणात नाराज आहे. या नाराजीचा फटका आमदार कांबळे यांना येणाऱ्या विधानसभा निवडणूक मध्ये बसु शकतो. त्या सध्या स्व. जयंतराव ससाणे यांचे समर्थक आमदार कांबळे यांच्यावर नाराज असल्याने, त्याचा देखील कांबळेना मताचा फटका बसणार आहे. आज तालुक्यातील जनतेला हा प्रश्न पडला? की आमदार साहेबांना पाच वर्षात रस्ते दुरुस्ती करण्यासाठी निधी मिळालाच नाही का? आता या सर्व कामाचा हिशोब जनता येणाऱ्या विधानसभा निवडणूक मतदानातुन दाखवून देईल. सध्या जिल्हा विभाजन करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. परंतु आ. कांबळे या विषयावर विधानसभेत का लक्षवेधी मांडत नाही? या विषयी तालुक्यात चर्चा आहे