Breaking News

चला घडवुया वाघीनीला उपक्रमास चांगला प्रतिसाद


राहुरी /तालुका प्रतिनिधी/ - जागतिक महिला दिनानिमित्त घडवूया धाडसी वाघीणीला हा अनोखा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रेव्ह गर्ल मार्गदर्शीका मिना जाधव होत्या. यावेळी तृतीयपंथी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संचिता पाटिल, पत्रकार मीरा शिंदे, चैतन्य उद्योग समुहाच्या संचालिका मंदा भांड, संगीता कपाळे, संसारे, पाटिल, प्रतिभा जऱ्हाड उपस्थित होत्या.

कार्यक्रम प्रसंगी रंजना शिदे, मंदा साबळे, अलका तारडे, यांच्या सह सोनाली ताबे, यशश्री गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डाॅ उज्वला कड, संगिता शहा, रत्नमाला संसारे, संगिता कपाळे, जयश्री पाटील, सुवर्णा ज-हाड, रेखा जाधव, मंदा चव्हाण, भारती चोरडिया, अंजली थोरात,आदी सह परिसरातील महिला उपस्थित होत्या. यावेळी कराटे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली तसेच लावणी नृत्य सादर केले गेले.सूत्रसंचालन राजेश मचरे यांनी केले. ज्या महिलांना दोन पेक्षा जास्त कन्या आहेत त्यांचा सन्मान करण्यात आला.