Breaking News

सर्वोच्च न्यायालयाने खाप पंचायतींचा निर्णय ठेवला राखून

नवी दिल्ली : खाप पंचायतींच्या संदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या संदर्भात बोलताना सर्वोच्च न्यायालयाने जात, गोत्र, गाव पंचायत वा खापचा उल्लेख क रणार नसल्याचे म्हटले आहे. आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने म्हटले, ’आपसातील सहमतीने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणार्‍या वयस्क ांना राज्य सरकारने सुरक्षितता देणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्यावतीने पिंकी आनंद यांनी म्हटले आहे की, ज्या जोडप्याला कसल्याही प्रकारची भीती वाटत असेल तर त्यांनी आपल्या लग्नाची नोंद करताना ’मॅरेज ऑफिसर’ला याची माहिती द्यावी, जेणेकरून मॅरेज ऑफिसर त्यांना सुरक्षा देण्यासंदर्भात पोलिसांना सूचना देतील.