इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू
मुंबई : डहाणू तालुक्यातील कासामधील इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. येथील दुमजली मॉलला आज पहाटेच्या सुमारास आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अजूनही इमारतीत एक जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. या दुमजली इमारतीमध्ये धान्याचे गोदाम आणि तेलाचे ड्रम असल्याने आग लागल्याची शक्यता वर्तवली आहे. कासामधील मुख्य बाजारपेठेत हा मॉल असल्याने आसपासच्या दुकानांना आग लागू नये याबाबत काळजी घेतली जात आहे.