Breaking News

एका रात्रीत 6 एन्काऊंटर

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशामध्ये काल एका रात्रीत लगादार सहा एन्काऊंटरमध्ये गुंडांचा खात्मा करण्यात आला आहे. नोएडा पोलिसांनी एक लाख रूपयांचे इनाम असलेला मोस्ट वा ॅन्टेड गुंड श्रवण चौधरीचा खात्मा केला आहे. दिल्लीत अणि नोएडात खुनाचे अनेक गुन्हे दाखल असलेला गुंड श्रवन मागील अनेक दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी घटना स्थळावर एके 47, एसबीबीएल गन व स्विफ्ट डिजायर जप्त केली आहे. अशी माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आली. दादरीमध्येही पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जिंतेंद्र नावाचा गुंड जखमी झाला, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.