पुणे : गुंतवणुकदारांच्या फसवणुकीप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना पुणे सत्र न्यायालयाने 15 मार्चपर्यंत पेलीस कोठडी सुनावली आहे.डीएसके यांच्यासह त्यांच्या पत्नीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. क ाही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने डी एस कुलकर्णी यांना फटकारत त्यांचे अटकेपासून संरक्षण काढून घेतले होते. त्यानंतर डीएसकेंना त्यांच्या पत्नीसह दिल्लीतून अटक क रण्यात आली. दरम्यान, त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर केली असता सत्र न्यायालयाने त्यांना 1 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. काही दिवसांपूर्वी डीएसकेंच्या अ लिशान गाडया जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत डीएसकेंना 15 मार्चपर्यंत पेलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
डीएसकेंना 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
22:03
Rating: 5