Breaking News

’आप’च्या 20 आमदारांना दिलासा

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. ’आप’च्या 20 आमदारांना ऑफीस ऑफ प्रॉफिट प्रकरणी अपात्र ठरवण्याची निवडणूक आयोगाची शिफास न्यायालयाने फेटाळली आहे. संबंधित आमदारांना अपात्र ठरवण्यापूर्वी योग्य प्रकारे सुनावणी करण्यात आली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची पुन्हा नव्याने सुनावणी करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. हे प्रकरण न्यायालयाने पुन्हा एकदा पुनर्विचारासाठी निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. आम आदमी पक्षाच्या या आमदारांना ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजेच लाभाचे पद ठेवल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले होते. संबंधित आमदारांनी संसदीय सचिवाची नियुक्ती केली होती.