Breaking News

कुपवाडा चकमक : शस्त्र साठा, स्फोटके जप्त


कुपवाडा - जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हल्मतपोरा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांत जोरदार चकमक उडाली होती. यात 21 मार्चला भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. तर भारताचेही पाच जवान या चकमकीत शहीद झाले होते. या चकमकीनंतर, आता या भागात मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. कुपवाडा चकमकीत मारले गेलेले पाचही दहशतवादी विदेशी होते. तसेच, काही भागात शोध मोहीम आखली असताना कारवाई नियंत्रणाच्या स्थितीत होती, असे काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. पनी यांनी गुरुवारी दिली. ही चकमक कुपवाडापासून 8 किलोमिटर अंतरावर झाली होती.