Breaking News

राज्यात मुलींचा जन्मदर घटला

मुंबई,  राज्यात गतवर्षी झालेल्या नागरी परिक्षणानंतर हजार मुलांमागे मुलींचा 904 एवढा जन्मदर असल्याचा अहवाल आहे. स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासंदर्भात सरकार प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. 416 संशयीत सोनोग्राफी केंद्रावर लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत शिवसेना आमदार सुनिल शिंदे यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता.त्यास उत्तर देताना डॉ. सावंत म्हणाले, नीती आयोगाच्या अहवालानुसार 2012 ते 2014 या वर्षांत देशातील 21 प्रमुख राज्यांपैकी 17 राज्यात मुलींच्या जन्मदरात घट झाली असून, महाराष्ट्र राज्याचा त्यात समावेश आहे. यानंतर नागरी सर्व्हे झाला यानुसार राज्यात दर हजारी 904 इतकी मुलींची संख्या असल्याचा अहवाल आला आहे.