Breaking News

मलनिस्सारण केंद्रासाठी 180 कोटींची योजना मंजूर

सोलापूर, दि. 19, मार्च - केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून शहरातील ड्रेनेजलाइन आणि दोन मलनिस्सारण केंद्रासाठी 180 कोटींची योजना मंजूर झाली आहे. त्याचे टेंडर काढण्यात आले असून, अंतिम मान्यतेसाठी सभागृहाकडे प्रस्ताव आल्याचे सांगण्यात आले. 180 कोटींची ड्रेनेज लाइनची कामे हद्दवाढ भागात आहेत. ज्या भागात ड्रेनेज नाही तेथे काम करण्यात येईल. यासाठी महापा लिका आयुक्तांनी टेंडर प्रक्रिया राबवली. त्यापैकी एकास मक्ता निश्‍चित करून सभागृहाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात आला. स्थायी समिती सभापती पद रिक्त आणि न्यायालय प्रविष्ट असल्याने प्रस्ताव स्थायी समिती ऐवजी सभागृहाकडे पाठवण्यात आला आहे.