Breaking News

उत्तरपत्रिका जळाल्याप्रकरणी 14 कर्मचार्‍यांचे निलंबन

बीड : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या तब्बल 1300 उत्तरपत्रिका जळाल्याप्रकरणी 14 कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील गटसाधन केंद्रात ही घटना घडली आहे. गटशिक्षणाधिकार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला. दहावी आणि बारावीच्या गणित विषयाच्या उत्तरपत्रिकांना अचानक आग लागल्यामुळे तब्बल 1300 उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. त्यानंतर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अ धिकारी अमोल येडगे यांनी गटसाधन केंद्राला भेट देऊन पाहणी केली. उत्तरपत्रिका जळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.