Breaking News

मैत्रीपूर्ण संबंध घट्ट करण्यासाठी भारत-फ्रान्समध्ये 14 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या

नवी दिल्ली : फ्रान्स आणि भारत या दोन्ही देशांतील शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देश व्यापार संबंध अधिक घट्ट करण्यावर भर देणार असल्याचे संयुक्त विधान केले. इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चेनंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले.


या चर्चेदरम्यान संरक्षण, अवकाश, सुरक्षा, ऊर्जा आणि मादक द्रव्यांची अवैध वाहतूक यासह विविध क्षेत्रातील 14 विषयांवरील सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. दोन्ही राष्ट्रातील तरूणांना युथ एक्सचेंज कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासंबंधित करारही यावेळी करण्यात आला. भारत व फ्रान्सच्या व्यावसायिक भागीदारीवर लक्ष केंद्रित करत मॅक्रॉन यांनी व्यापार युद्ध टाळण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापारात समतोल राखून ठेवण्यावर भर देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. भारत आणि फ्रान्समधील व्दिपक्षीय संबंध गेल्या 20 वर्षांपासून आहेत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा जयघोष केवळ फ्रान्समध्ये नाही तर भारतीय संविधानाने देखील ही तत्वे अंगीकृत के ली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
्र फ्रान्स भारतासाठी एक चांगला जोडीदार आणि युरोपचे प्रवेशद्वार ठरू शकतो, असे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. या दौर्‍यात मॅक्रॉन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ‘इंटरनॅशनल सोलार अलायन्स’च्या स्थापना परिषदेत उपाध्यक्ष या नात्याने भाग घेतील. या दौर्‍यामागे तीन महत्त्वाची करणे असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. येथील राष्ट्रपती भवनात झालेल्या औपचारिक स्वागतानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यातील पहिले कारण म्हणजे, भारत-फ्रान्सदरम्यानच्या सामरिक संबंधांसाठी नवी क्षेत्रे खुली क रणे, ज्यात, संरक्षण आणि सुरक्षा, संशोधन व विज्ञान आणि विशेषत्वाने आमच्या तरुणांचा आणि उच्च शिक्षणाचा समावेश असेल. भारत-फ्रान्स हे देश दहशतवादासारख्या अनेक समस्यांचा सामना करत आहे. या देशांना मोठ्या प्रमाणावर सारखाच धोका आहे, या दोन्ही देशाला धमक्या येत असतात, असेही मॅक्रॉन म्हणाले. त्यांच्या भारत दौर्‍याचे दुसरे क ारण म्हणजे, ‘इंटरनॅशनल सोलार अलायन्स’ परिषद. तर तिसरे कारण, फ्रान्स हा भारताचा चांगला मित्र होऊ शकतो, विशेषत्वाने युरोपातील, तो युरोपसाठी प्रवेशद्वार ठरू शकतो, असा संदेश देणे, हे त्यांच्या या भेटीमागील कारण आहे.