Breaking News

मोहाडी पोलिसांकडून 10 मोटरसायकली हस्तगत

धुळे, दि. 25, मार्च - मोहाडी पोलिसांनी धुळे तालुक्यातील अवधान शिवारातून चोरीला गेलेल्या एमएच41/डब्ल्यु 2826 या क्रमांकाच्या मोटरसायकल चोरी प्रकरणी 13 मार्च रोजी संदिप ज्ञानेश्‍वर पाटील (20) समाधान अर्जुन पाटील (22) रा. बिलाडी ता.धुळे या दोघांना अटक केली होती.

पोलिसांच्या तपासात धुळे शहरातील देवपूर, देवपूर पश्‍चिम आदी भागातून मोटरसायकल चोरल्याची कबूली मोहाडी पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून आतापर्यंत 2 लाख 95 हजार रुपये किंमतीच्या 10 मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई पोलिस अधिक्षक एम रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.