Breaking News

प्रकाश झोतात रंगणार मर्यादित षटकांचे टेनिस क्रिकेट सामने

डोंबिवली, दि. 25, मार्च - जय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा माध्यमातून सोनारपाडा चषक 2018 या विषयावर भव्य मर्यादित षटकांचे टेनिस क्रिकेट सामने प्रकाश झोतात होणार आहेत. जय गावदेवी संघ सोनारपाडाचे आधारस्तंभ माजी सरपंच मुकेश पाटील आणि विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक दत्ता ठाकूर आणि समीर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खेळविले जाणार आहेत.

पूर्वेकडील मानपाडा रोडवरील प्रीमियर कॉलनीच्या भव्य मैदानावर पाच दिवस खेळविले जाणार आहेत. प्रत्येक दिवशी 8 संघ खेळणार असून प्रथम आलेल्या 32 संघाची निवड टेनिस क्रिकेट स्पर्धे साठी करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नियमावली तयार करण्यात आली असून प्रत्येक संघात एकाच गावातील खेळाडू असणे बंधनकारक आहे.

विशेष म्हणजे प्रत्येक संघास स्पर्धेसाठी टिशर्ट देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 2 लाख आणि आकर्षक चषक, द्वितीय 1 लाख आणि आकर्षक चषक, तृतीय 50 हजार आणि आकर्षक चषक, चतुर्ध 50 हजार आणि आकर्षक चषक तसेच मालिकावीर साठी विक्रांत बाईक, उत्कृष्ट फलंदाजसाठी फ्रिज, उत्कृष्ट गोलंदाजसाठी कुलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी वॉच अशी भरघोस पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.