जळगाव, दि. 07, मार्च - भुसावळ शहरातील स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे ‘स्नेहयात्री करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा शनिवार, 10 व रविवार, 11 मार्च रोजी शहरातील श्रीकृष्णचंद्र सभागृहात होत आहेत. एकांकिका सादर होणा-या रंगमंचाला माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे पूत्र स्व.निखील खडसे यांचे नाव देण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील 14 संघ एकांकिका सादर करणार आहेत. यात प्रामुख्याने मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक, अकोला, जळगांव, चोपडा व भुसावळ येथील संघ आपली एकांकिका सादर करणार आहेत. स्पर्धेकरीता स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्रे आणि एकूण 42 हजार रुपयांची रोख सांघिक व वैयक्तिक असे बक्षिसांचे स्वरुप असणार आहे. ह.भ.प.कै. कालिदास विठोबा नेमाडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उमेश नेमाडे यांच्याकडून सांघिक एकांकिकेचे प्रथम बक्षीस, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याकडून सांघिक एकांकिकेचे व्दितीय बक्षीस तसेच न्यू जवाहर डेअरी व आईस्क्रीम, भुसावळचे संचालक सुरेश पाटील यांच्याकडून सांघिक एकांकिकेचे तृतीय बक्षीस देण्यात येणार आहे.
भुसावळात 10 व 11 मार्चला 14 एकांकिकांची मेजवानी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:59
Rating: 5