यावलचा लाचखोर कृषी सहाय्यक जाळ्यात
जळगाव, दि. 07, मार्च - भुसावळ येथे प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी 1 हजार 500 रुपयांची लाच मागणा-या यावल तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक कृषी सहाय्यक रामसिंग भोमसिंग पवार यास जळगाव एसीबीने आज, रंगेहाथ अटक केली. जळगावच्या जनाई ईरीगेशनमधील अभियंत्यांनी या संदर्भात तक्रार दिली होती.
शेतकर्यांकडील ठिबक सिंचन अनुदानाचे प्रस्ताव तयार करून ते पुढील कारवाईसाठी पाठवण्यासाठी आरोपीने लाच मागितली होती. लाच घेताना आरोपी रामसिंग पवार (श्रद्धा का ॅलनी, जळगाव) यास आज, दुपारी अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव एसीबीचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.