आरक्षणासाठी सर्वेची गरजच काय : वाघमोडे
श्रीरामपूर प्रतिनिधी ;- अनेक राज्यात राज्यघटने प्रमाणे धनगरांना ,SC , ST चे आरक्षण लागू आहे. त्या राज्यांना धनगरांना आरक्षण देण्याकरता कधीच सर्वे करण्याची गरज पडली नाही. मग महाराष्ट्रात बीजेपी सरकारलाच का, असा सवाल अहिल्याक्रांती प्रतिष्ठान व क्रांतीसेनेच्या अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांनी उपस्थित केला.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की दि. ८ मार्च जागतिक महिलादिनानिमित्त महिलांचा सन्मान केला जातो. त्यामुळे महिलादिनानिमित्त समस्त महिला वर्गाच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात. धनगर समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत. बारामती येथे झालेल्या धनगर आरक्षण आंदोलनादरम्यान उपोषण सोडतेवेळी, पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊ म्हणणारे आणि नागपूरच्या पहिल्या मेळावा कार्यक्रमात महाधिवक्त्यांशी चर्चा करून १५ दिवसात आरक्षणाचा निर्णय घेऊ म्हणणारे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन - साडे तीन वर्षे झाली, तरीही काहीच निर्णय घेऊ शकले नाहीत. दि. ८ मार्च रोजी मुख्यमंत्री महोदयांनी आपली उपस्थिति दर्शवून पिवळा भंडारा उचलून आपले म्हणणे स्पष्ट करावे. अन्यथा पुढील टप्प्यात धनगर समाजाच्यावतीने मुख्यमंत्री बंगल्याच्या समोर जागरण गोंधळ घालण्यात येईल. न्याय्य हक्कासाठी समस्त धनगर समाजबांधवांनी या लाक्षणिक उपोषणात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वाघमोडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.