Breaking News

पिढी आदर्श काम करु शकते : मोरे

लोणी।प्रतिनिधी  ;- युवा पिढीला दिशा दिली तर ते शिक्षणासोबत सामाजिक कार्यातदेखील आदर्श काम करु शकतात, याचा खरा प्रत्यय सध्या लोणीच्या अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ, त्रंबकेश्वरअंतर्गत स्वामी समर्थ युवा प्रबोधन केंद्र, लोणीच्या माध्यमातून येतो, असे प्रतिपादन गुरूपुत्र नितीन भाऊ मोरे यांनी केले.


लोणी येथील आय टी आय, चंद्रापूर रोड परिसरात गेल्या ४ वर्षांपासून प. पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरूपुत्र नितीन भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ युवा प्रबोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रात दर गुरुवारी सायंकाळी ६ वाजता विद्यार्थी एकत्र येऊन नेवेद्य देऊन आरती करतात. यात कृषी संलग्नित महाविद्यालय, आय. टी. आय व अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुमारे २०० ते २५० विद्यार्थी एकत्र येतात. या केंद्रात विद्यार्थ्यांसाठी दर मंगळवारी दु.२ ते ५ या दरम्यान समस्या समुपदेशन कार्यक्रम घेतला जातो. ग्रामीण भागाचा विकास व्हावा, लेक वाचवा अभियान, स्वयंरोजगार, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छचता आदी माध्यमातून वेगळा ठसा या मुलांनी निर्माण केला आहे.