Breaking News

कोषागार विभागीय क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात


सिंधुदुर्गनगरी  - संचालनालय, लेखा व कोषागार कर्मचारी कल्याण समिती तर्फे आयोजित विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहणाने उत्साहात सुरुवात झाली.
दोन दिवस चालणार्‍या या स्पर्धांमध्ये 260 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. यामध्ये 100 मी. धावणे, गोळा फेक, थाळी फेक, क्रिकेट, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल, चालणे 3 व 5 कि.मी., रिले महिला व लांब उडी या मैदानी खेळांबरोबरच जलतरण, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धीबळ, कॅरम या इंनडोअर क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
ध्वजारोहण जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विविध खेळाडूंनी संचलनाद्वारे ध्वजास मानवंदना दिली. यावेळी क्रीडा ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. यावेळी सहभागी सर्व खेळाडूंनी शपथ ग्रहण केली.या क्रीडा स्पर्धांचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा 18 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालनालय लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे संचालक ज.रा.मेनन हे असणार आहेत. तर सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या हस्ते बक्षिस वितरण होणार आहे.