Breaking News

छिंदम यांच्या वक्तव्याचा नगर तालुका मराठा महासंघाच्या वतीने निषेध


नगर तालुका आखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने भाजपचे उपमहापौर यांनी श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. तर छिंदम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अ.भा. मराठा महासंघाचे नगर तालुकाध्यक्ष पै.नाना डोंगरे, नगर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन साहेबराव बोडखे, भागचंद जाधव, नामदेव फलके, पै.संदिप डोंगरे, सुयश जाधव, ऋषीकेश बोडखे, सचिन जाधव, गौतम फलके, मयुर काळे, अतुल फलके, किरण ठाणगे, लक्ष्मण चौरे, भाऊसाहेब जाधव, गोकुळ जाधव आदि उपस्थित होते.
पै.नाना डोंगरे म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची घटना निंदनीय आहे. छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा ही सर्व शिवप्रेमींची मागणी आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्व जाती, धर्म व समाजातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असून, त्यांना माफी मागण्याचा अधिकार देखील राहिला नाही. या चुकीला माफी नसल्याचे त्यांनी सांगितले.