नाथाभाऊंनी झाड लावले चोर-उचक्के सावलीत आणी नाथाभाऊ उन्हात!
बहुजनांनो.... !
शुद्रादिअतिशूद्र कष्टकर्यांची आर्थिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक कमाई तथाकथित उच्चजातीय-वर्गीय कशी लुटून नेतात व त्या चोरीच्या कमाईवर हे उच्च(?) लोक कशी मौजमस्ती करतात हे आपण मागील खेपेत पाहिले. अर्थात हे उच्च(?) लोक खरोखर गुणवत्तेत उच्च असतात असे नाही. इतिहास-संस्कृतीवर डाके टाकल्याने ते सांस्कृतिकदृष्ट्या मुजोर होतात व सत्तास्थानी जाऊन बसतात, परिणामी आर्थिक डाका टाकायलाही पात्र होतात. याचे एक उदाहरण दिले तर ते अधिक सोपे होईल.
कालच माजी मंत्री एकनाथराव खडसेसाहेबांनी व्याघ्र-गर्जना केली. मला पक्ष सोडायला मजबूर करू नका, नाहीतर मी खरोखरच पक्ष सोडून जाईन? या व्याघ्र गर्जनेला कोणी भाजपवाला घाबरला का? नाही! का नाही घाबरला?? नाथाभाऊ म्हणतात की, ज्यांनी झाड लावले व वाढवीले ते उन्हात व बाहेरचे परके लोक सावलीत आहेत. नाथाभाऊसारख्या असंख्य ओबीसी-बहुजनांनी रास्त राजकीय महत्वाकांक्षा उराशी बाळगूण अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट घेऊन झाडे लावलीत. रात्रंदिवस जागून झाडाचे पालन-पोषण केले. मात्र वटवृक्ष झालेल्या या झाडांच्या सावलीत आज सगळे चोर-उचक्के बसले आहेत व ते झाडाची फळे चाखत आहेत. झाड लावणारा उन्हातच!
झाड लावणारा माणूस मालक असतो व तोच सावलीत बसू शकतो, हा सर्वसाधारण नियम आहे. पण जर हे झाड तुम्ही पाकिस्तानात जाउन लावले असेल तर? ते तुमच्या मालकीचे राहील काय? आणि तुम्हाला त्या सावलीत बसता तरी येईल काय? आता येथे पाकीस्तान म्हणजे शत्रूराष्ट्र असा अर्थ आहे. आता एकाच देशात राहणारे लोक एकमेकांचे राष्ट्र-शत्रू कसे असू शकतात, हा साधा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाचे उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्माजी गांधींना स्पष्टपणे दिले आहे. बाबासाहेबांनी गांधींसमोर साधा-सरळ मुद्दा ठेवला- ‘’मिस्टर गांधी मला मायभूमी नाही.’’ या मुद्द्याला अधिक टोकदार करतांना ते घटना समितीच्या चर्चेत सांगतात कि, ‘ज्याला तुम्ही स्वयंपूर्ण गाव म्हणतात, ती एक गटारगंगा आहे. हे गाव दोन शत्रूराष्ट्रात विभागलेले आहे’.
बाबासाहेब जेथे प्रत्येक गावाला शत्रूराष्ट्रात विभागतात, तेथे राज्याचे व देशाचे काय? देश म्हणजे भुप्रदेश, झाडे, नद्या, पर्वत वगैरे नाही. देश म्हणजे त्या विशिष्ट भूप्रदेशात राहणार्यो लोकांचा समुदाय, म्हणजे देश होय! या लोकांना इतिहास असतो, संस्कृती असते. त्यांच्यात विविधता असते आणी तरीही ते एक ‘राष्ट्र’ भावनेने एकमेकांना बांधलेले असतात. भरतखंडात बलिराष्ट्र, बौद्धराष्ट्र होते तोपर्यंत ते सर्व ‘एकमय नेशन’ होते, असे तात्यासाहेब महात्मा जोतीराव आपल्याला सांगतात. परंतू आर्य आक्रमणानंतर हे राष्ट एकमय नेशन राहीले नाही. प्रत्यक गाव दोन शत्रू राष्ट्रात विभागले गेले. गावकुसातले आणी गावकुसाबाहेरचे! नंतर एकाच गावात अनेक शत्रू-उपराष्ट्रे निर्माण झालीत, ब्राह्मणवाडा, पाटीलवाडा, माळीवाडा, महारवाडा हे छोटे-छोटे प्रदेश म्हणजे छोटीछोटी शत्रूराष्ट्रे होत. आजही आहेत. परंतू ब्राह्मणी-हिंदू धर्माची अफु-चरस खाऊन येथल्या बहुजनाला आपण सारे एक आहोत, असे वाटते. अफु-चरस खाऊ घालणारा स्वतः मात्र शुद्धीत असतो. त्यामुळे त्याला शत्रूराष्ट्राच्या सीमा व भुप्रदेश स्पष्टपणे दिसत असतात. तो कधीच शत्रूराष्ट्रात जाऊन झाड लावणार नाही. मात्र आमचे नाथाभाऊ, भुजबळ, मुंडे यासारखे बहुजन नेते धर्माच्या नावाखाली ब्राह्मणवाड्यात जाऊन झाड लावून येतात, नित्यनेमाने पाणी-खत घालायलाही जातात. आणी जेव्हा झाड वटवृक्ष बनते तेव्हा यांना यांच्या माळीवाड्याचा व लेवापाटील वाड्याचा रस्ता दाखविला जातो.
झाड कोणी लावले हे महत्वाचे नाही, कोणाच्या शेतात लावले आहे हे महत्वाचे. शेताचा मालक हाच झाडाचा मालक! तोच ठरविल या झाडाखाली कोणी बसायचे व कोणी फळे चाखायची? शूद्र लोक ब्राहमण-राष्ट्रात जाऊ शकतात, पण सेवा करण्यासाठी, तेथे कायमची वस्ती करण्यासाठी नाही. तुमच्या सेवेने ते तृप्त झालेत की तुम्ही आपआपल्या जातीराष्ट्रात वापस आले पाहिजे. येथे पुन्हा बाबासाहेबांची आठवण येते. बाबासाहेब म्हणाले की आपली रिपब्लीकन झोपडी बरी, काँग्रेस-भाजप-सेनेच्या बंगल्यात तुम्हाला घर-गडी म्हणून आऊटहाऊसमध्ये राहावे लागेल. उदाहरणार्थः संत चोखोबा!
फुले आंबेडकरवादाचा शास्त्रशूद्ध अभ्यास नसल्याने व केवळ भावनिक फुलेवाद व अतिभावनिक आंबेडकरवादाच्या नादी लागून अनेक दलित-बहुजन म्हणविणारे नेते-विचारवंत-साहित्यिक आजही ब्राह्मण-राष्ट्रातील बंगल्यांच्या आऊटहाऊसमध्ये झिंगत पडलेले आहेत, तेथे नाथाभाऊ, भुजबळ, मुंडे यांना दोष देऊन उपयोग काय? बाबासाहेबांनी जातीअंताच्या चळवळीचे मार्गदर्शक-अग्रदल म्हणून ज्या एस.सी. (दलित) कॅटेगिरीवर जबाबदारी सोपवली आहे, तेच आज जयंती-मयंती, स्मारके, पुतळे, अमकी भुमी, टमकी भुमीच्या वार्याश करण्यात गुंग आहेत. मार्गदर्शक-नेताच जर अप्रत्यक्षपणे फितूर झालेला असेल त्या चळवळीचा सत्यानाश ठरलेलाच आहे व ब्राह्मण-राष्ट्राचा विजय ध्वज उंचावणारच आहे.
जयजोती! जयभीम!!
Mobile - 88 301 27 270
Email- s.deore2012@gmail.com