दखल - राजस्थानमध्ये भाजपला बुरे दिन!
राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, त्रिपुरा, मेघालय, नागालँड, छत्तीसगड आदी आठ राज्यांच्या निवडणुका तसंच लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला. गुजरातमध्ये भाजपला करावी लागलेली कसरत लक्षात घेऊन अर्थसंकल्पात जेटली यांनी घोषणांचा पाऊस पाडला असताना त्याच वेळी राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या एका जागेवर पराभव पत्करावा लागला. राजस्थानमध्ये गेल्या वेळी लोकसभेच्या 25 च्या 25 जागांवर भाजप विजयी झाला होता. याचा अर्थ काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. दर पाच वर्षांनी राजस्थानमध्ये सत्ताबदल होत असतो. या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये विधानसभेच्या एका आणि लोकसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
या तिनही जागी काँग्रेसच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला असून पुढच्यावर्षी राज्यात होणाजया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा निकाल ’बुस्टर डोस’ ठरला आहे. मंडलगढ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विवेक धाकड यांनी भाजपचे उमेदवार शक्ती सिंग हडा यांचा 12 हजार 976 मतांनी पराभव केला. खरं तर हा मतदारसंघ काँग्रेसचा पूर्वापार बालेकिल्ला असून 2013च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं हा गड काँग्रेसकडून खेचून आणला होता. या वेळी काँग्रेसनं या पराभवाचा वचपा काढला. अल्वर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार करण सिंह यादव यांनी भाजपचे जसवंत यादव यांचा पराभव केला आहे, तर अजमेर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे रघू शर्मा विजयी झाले आहेत. अजमेरचे खासदार संवरलाल जाट, अल्वरचे खासदार महंत चंदनाथ योगी आणि मंडलगढच्या आमदार कीर्ती कुमारी यांच्या निधनामुळं ही पोटनिवडणूक घेण्यात आली. वास्तविक आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेतला, तर ज्या मतदारसंघात एखाद्या
लोकप्रतिनिधीचं निधन झालेलं असतं, त्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत संबंधित पक्षाचेच उमेदवार विजयी होतात. त्याला काही अपवाद असतात. नाही असं नाही. परंतु, राजस्थानात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतील तीनही जागा भाजपला गमवाव्या लागतात, हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. मागच्या महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीतही भाजपला जागा गमवाव्या लागल्या होत्या. राजस्थानच्या जिल्हा परिषषदांतही काँग्रेसला विजय मिळाला होता. नगरपालिकांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे व त्यांचा मुलगा दुष्यंतकुमार यांच्या मतदारसंघात काँग्रेसनं बाजी मारली होती.
पश्चिम बंगालमध्ये अजूनही ममता बॅनर्जी यांचीच जादू चालते. तृणमूल काँग्रेसचा खासदार फोडून त्याला भाजपनं उमेदवारी दिली होती. त्याचा चार लाख सत्तर हजार मतांनी नवख्या उमेदवारानं पराभव केला. या मतदारसंघात भाजपनं दुसजया क्रमाकांची मतं मिळविली. पश्चिम बंगालमधील उलुबेडिया लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार सजदा अहमद यांनी 4 लाख 70 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे, तर नोयापाडा विधानसभा मतदारसंघातूनही तृणमूलचे उमेदवार सुनील सिंह विजयी झाले आहेत. काँग्रेस व डाव्यांच्या दृष्टीनं हा धोक्याचा इशारा आहे. या निवडणुकीच्या निकालावर राजस्थानच्या जनतेनं भाजपला नाकारलं आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली. राजस्थान काँग्रेसनं उत्तम कामगिरी बजावली आहे. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांवर मला अभिमान आहे, असं राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे काँग्रेसचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनीही भाजपवर निशाणा साधताना मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी केली. काँग्रेसनं विधानसभेसाठी सचिन पायलट यांच्याकडं नेतृत्त्व दिलं आहे. पायलट तरुण आहेत. हा विजय त्यांचं वजन वाढविणारा आहे.
भाजपचा सुपडा साफ; पाचही जागांवर पराभवएकीकडे अर्थसंकल्पातून 2019 लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा होत असताना दुसरीकडे राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा सुपडासाफ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. यावर्षीच राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, भाजपला हा मोठा झटका मानण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानमधील विजयाबद्दल कौतुक करताना राजस्थानमधील नागरिकांनी भाजपला नाकारल्याचे म्हटले आहे. राजस्थानमधील अजमेर आणि अल्वर या लोकसभेच्या जागांवर काँग्रेसने मोठा विजय मिळविला आहे. अल्वर येथे काँग्रेसचे उमेदवार करणसिंग यांनी भाजपचे उमेदवार जसवंतसिंह यादव यांचा 1 लाख 56 हजार मतांनी पराभव केला. तर, अजमेरमध्ये काँग्रेसचे उमेदवार रघु शर्मा यांनी मोठी आघाडी घेतली आहे. मंडलगढ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या विवेक ढाकर यांनी विजय मिळविला. पश्चिम बंगालमध्ये उलुबेरिया या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत तृणमुल काँग्रेसचे उमेदवार सजदा अहमद यांनी भाजप उमेदवार अनुपम मलिक यांचा 4 लाख 74 हजार मतांनी पराभव केला. तृणमुलने विधानसभेच्या एक जागेवरही विजय मिळविला आहे. राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी भाजपच्या अहंकाराविरोधात मिळविलेला हा विजय असल्याचे म्हटले आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशोक परनानी यांनी 2019 मध्ये विजय मिळविण्यासाठी कठोर प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.