Breaking News

शिवशक्ती कृषी उद्योग समुहाचे उद्घाटन


स्पर्धेच्या युगात तरुणांनी नौकरीच्या मागे न धावता ज्याला जो व्यवसाय करता येईल तो व्यवसाय प्रामाणिक, जिद्द व चिकाटीने करावा त्यांना यश हे हमखास मिळणारच आहे. व्यवसाय करण्याला कोणत्याही जाती धर्माचे बंधन राहिलेले नाही. त्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. असे मत काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी व्यक्त केले. कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथे शिवशक्ती उद्योग फार्मस् प्रोड्युसर कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी बाळासाहेब साळुंखे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार किरण सावंत यांच्या हस्ते करण्यात आलेे. यावेळी जि. प. सदस्य गुलाब तनपुरे, तहसीलदार नामदेव तळेकर, सुधीर पाटील, महाराष्ट्र राज्य मेट्रोचे प्रमुख मृत्यूंजय कुमारसिंह, संपत बावडकर, विष्णुपंत टकले, डॉ. रामदास टकले, उद्धव नेवसे, सागर जवणे, जयदीप सूर्यवंशी, विनीत टकले, आदी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष सूर्यवंशी यांनी केले. भविष्यात शेतकर्‍यांना सामुहिक पद्धतीने व आधुनिक पद्धतीने शेती करावी लागणार आहे. कर्जत तालुक्यात शासकीय उडीद खरेदी केंद्रांत शेतकर्‍यांची पिळवणूक करण्यात आली. यामध्ये शेतकर्‍यांकडून वेगवेगळ्यामार्गाने पैसे उकळण्यात आले आहेत. पैसे घेतल्यानंतर मात्र शेतकर्‍यांच्या मालाची बिनबोभाट खरेदी केली जात होती. असा प्रकार आता तूर खरेदीत होऊ नये अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा बाळासाहेब साळुंके यांनी दिला आहे. 
मिरजगाव परिसरातील दर्जेदार प्रकारचा कांदा व डाळिंब थेट शेतकर्‍यांकडून योग्य भावात खरेदी केला जात आहे. गेल्या पाच वर्षांत 50 हजार मेट्रिक कांदा खरेदी करण्यात आला आहे. पुढील काळात शेतकर्‍यांना योग्य भाव देण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. पुढील काळात याभागात मोठा प्रक्रिया उद्दोग सुरु करण्याचा माणस असल्याचे मत विनय टकले यांनी व्यक्त केले.