येथील तेली समाजाने धुळे जिल्ह्यातील घटनेचा निषेध करत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली.धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे एका तेली समाजाच्या पाच वर्षीय चिमुकलीवर नराधामाने अत्याचार केला. ही चिमुकली येथील नूतन विद्यालयात शिकणार्या पाच वर्षीय चिमुकलीला 8 फेब्रुवारी 2018 रोजी मधल्या सुट्टीत चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून महेंद्र पाटील नामक नराधामाने बलात्कार केला. या घटनेने शाळेची बदनामी होईल म्हणून शाळेच्या संस्था चालकाने याविषयी कुठे वाच्छता न करण्यासाठी चिमुरडीच्या पालकांना धमकी देत आम्ही तुम्हाला वैद्यकीय खर्च देवू असे म्हणाले. परंतू पालकाने पिडीत बालिकेसाठी न्याय मिळण्याची मागणी केली. आता याच न्यायासाठी देशातील सर्व तेली समाज एकवटले असुन इतर बहुजन समाजही सहभागी झाले आहेत. आज दि. 25 फेब्रुवारी रोजी मिरजगांव येथील तेली समाजाचे शिवसेना नेते व उपसरपंच अमृत लिंगडे यांच्या नेतृत्वाखाली रामदास दळवी, वसंत क्षिरसागर, प्रकाश क्षिरसागर, अतुल देशमाने, सोनू पिसे, सुभाष देशमाने, संतोष थोरात, अशोक पोटे, दिनेश पिसे, अमोल देशमानेसह तेली समाज बांधवांनी मिरजगांव पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हे.काँ. सुरेश बाबर यांचेकडे सदरील घटनेतील आरोपीना शिक्षा मिळण्याबाबत कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन सादर करण्यात आले.
मिरजगावात तेली समाजाच्या वतीने निषेध व्यक्त
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:15
Rating: 5